Ad will apear here
Next
दादा कोंडकेंच्या २१व्या स्मृतिदिनानिमित्त गुणवंतांचे सत्कार
डॉ. शशिकांत चव्हाण, संतोष चोरडिया यांना गौरविले
दादा कोंडके यांच्या २१व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित  समारंभात डॉ. शशिकांत चव्हाण, संतोष चोरडिया, महेश मरळ आणि सुरेश पाटोळे यांचा सत्कार करण्यात आला.या वेळी दादा कोंडके मेमोरिअल फाउंडेशनचे मनोहर कोलते, राजेंद्र भवाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पुणे : दादा कोंडके मेमोरिअल फाउंडेशनतर्फे दादा कोंडके यांच्या २१व्या स्मृतिदिनानिमित्त एका विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गोखलेनगर परिसरातील कष्टकरी नागरिकांना अवघ्या दहा रुपयांत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणारे डॉ. शशिकांत चव्हाण आणि एकपात्री कलाकार संतोष चोरडिया यांचा सन्मान करण्यात आला, तर पंडित राम मराठे स्मृती संगीत स्पर्धेत तबलावादनात प्रथम क्रमांक पटकाविणारा युवा कलाकार महेश मरळ आणि ‘पुळका’ या कादंबरीचे लेखक सुरेश पाटोळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.


‘कलेच्या माध्यमातून समाजसेवेची मोठी संधी कलाकारांना उपलब्ध होत असते. सामाजिक उत्तरदायित्वातून उतराई होण्यासाठी कला हे एक चांगले माध्यम आमच्याजवळ असल्याचा अभिमान वाटतो. आजकाल माणुसकीचा झरा आटत चालला असताना, त्याला पाझर फोडण्याचे काम आम्ही आमच्या एकपात्री प्रयोगांच्या माध्यमातून करत असतो. दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या चेहऱ्यावर आपल्या कलेमुळे हास्य फुललेले पाहून आत्मिक समाधान मिळते. बाबा आमटेंचा आश्रम हे माझ्या सामाजिक जाणिवेचे ऊर्जा केंद्र आहे,’ अशी भावना एकपात्री कलाकार आणि सूत्रसंचालक संतोष चोरडिया यांनी व्यक्त केली.
 

‘दादा कोंडके यांनी सर्वसामान्य माणसाचे आपल्या कलेतून मनोरंजन केले नाही, तर त्यांचे प्रबोधनही केले. ते आजही तरुणांसाठी प्रेरणास्थान आहेत. सर्वसामान्य रसिकांमुळे दादा कोंडके आजही लोकांमध्ये जिवंत आहेत,’ अशी भावना सेवानिवृत्त कॅप्टन अप्पासाहेब खांबाळे यांनी व्यक्त केली.

या वेळी दादा कोंडके मेमोरिअल फाउंडेशनचे प्रमुख विश्वस्त मनोहर कोलते, सचिव राजेंद्र भवाळकर, विश्वस्त परशुराम शेलार, खजिनदार विक्रम जाधव, वामन जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोहर कोलते यांनी केले. राजेंद्र भवाळकर यांनी दादा कोंडके यांच्या आठवणींना उजाळा दिला. विश्वस्त परशुराम शेलार यांनी आभार मानले.

(दादा कोंडके यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित सत्कार समारंभाचा आणि संतोष चोरडिया यांच्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत.) 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZQSBY
Similar Posts
मूकबधिर विद्यार्थ्याचे पालकत्व घेऊन वाढदिवस साजरा पुणे : विद्या महामंडळाच्या मूकबधिर शिक्षण व प्रशिक्षण केंद्रात रेणुका दशरथ पवार हिचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी तिने ५० हजार रुपयांचा धनादेश संस्थेला प्रदान करून मूकबधिर विद्यार्थ्याचे पालकत्व स्वीकारले.
पुण्यात रंगली धमाल दिवाळी पहाट! पुणे : अवीट गोडीची गाणी, विनोदाचे षटकार, धमाल एकपात्री सादरीकरण अशा विविध टप्प्यांवर उत्तरोत्तर रंगत गेलेली दिवाळी पहाट खऱ्या अर्थाने कळसावर पोहोचली ती कलाकार आणि उपस्थित रसिकांनी घेतलेल्या ‘सिंगल यूज प्लास्टिक’ न वापरण्याच्या शपथेने. ‘संवाद, पुणे’ आणि एस. व्ही. इव्हेंट्स प्रस्तुत ‘रंगारंग धम्माल दिवाळी
आनंदवन, ताडोबा-अंधारी, चंद्रपूर भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हे वनश्रीने नटलेले, खनिजांनी समृद्ध असलेले, महाराष्ट्राची विजेची गरज भागविणारे, तसेच आदिवासींचे वास्तव्य असलेले विदर्भातील प्रमुख जिल्हे आहेत. या जिल्ह्यांतील विविध प्रकारच्या पर्यटनस्थळांची माहिती आपण करून घेणार आहोत. सुरुवात करू या आनंदवन, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि चंद्रपूरपासून
मोहित टाकळकर चित्रपट दिग्दर्शनात मुंबई : मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड रंगभूमीवरील आघाडीचा दिग्दर्शक मोहित टाकळकर आता चित्रपट दिग्दर्शनासाठी सज्ज झाला असून, ‘मीडियम स्पाइसी’ या चित्रपटाच्या माध्यमातून तो मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. एक उत्तम संकलक म्हणूनही त्याची ओळख आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language